दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) Lyrics in Marathi
Movie Name : माझा मुलगा (१९७६) (Majha Mulaga)
दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) is the marathi song sung by Anuradha Paudwal.
दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) lyrics has written Yashvant Dev and The music of this song is given by Yashavant Deo.
दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) Lyrics Credits :
Singer : | Anuradha Paudwal |
---|---|
Lyricist : | Yashvant Dev |
Music : | Yashavant Deo |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | माझा मुलगा (१९७६) (Majha Mulaga) |
दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) Lyrics in Marathi :
दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत, ओवाळणी थाटात घरोघरी आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभांत सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा-गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षासरी,
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
सनईच्या सुरांत होईल पहाट, अत्तराचं पाणी, स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला, आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
देवापाशी मागेन एकच दान, भावाच्या यशाची चढो कमान
औक्ष असू दे बळकट, नको करू ताटातूट
चंद्रज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार
भावाविण अंधार दाटे उरी,
आमच्या घरी अन् तुमच्या घरी !
Did you enjoy दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) song lyrics?. if there is any mistake in lyrics of दिवाळी येणार अंगण सजणार (Diwali Yenar Angan Sajnar) song please contact us.