अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) Lyrics in Marathi
Movie Name : पाहुणी (Pahuni)
अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) is the marathi song sung by Arati Hawaldar,Rashmi Havaldar.
अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) lyrics has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Ram Kadam.
अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) Lyrics Credits :
Singer : | Arati Hawaldar,Rashmi Havaldar |
---|---|
Lyricist : | Jagdish Khebudkar |
Music : | Ram Kadam |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | पाहुणी (Pahuni) |
अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) Lyrics in Marathi :
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
मांडला ग मांडला वेशीच्या दारी
आता त्या पूजूया सांजच्या पारी
पूजिता पूजिता आभाळ भरलं
धरती मातेचं दूरित सरलं
अक्कण माती चिक्कण माती जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई गहू बी दळावं
अस्सं गहू सुरेख बाई सोजी बी काढावी
अश्शी सोजी सुरेख बाई पोळ्या की लाटाव्या
अश्श्या पोळ्या सुरेख बाई म्हायेरी धाडाव्या
अस्सं म्हायेर सुरेख बाई खायाला घालितं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारितं
बारा घरच्या बारा जणी खेळितो अंगणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
काय सांगू? माझं माहेर मोलाचं
कसं सांगू? राजा इंद्राच्या तोलाचं
माहेराचा ठेवा असा देवाजीची करणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
चौसोपी माझा माहेरचा वाडा
मीठ-मोहर्यांनी दृष्टी कुणी काढा
हिरे-माणकं भरली जशी वाड्याच्या नौखणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
माहेराची माया कुणाला गावं ना?
माहेराचं सूख पदरात मावंना
आई-बाबा-दादा-वैनी सारी अबादानी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
म्हायेराचा लळा जिवाला लागीला
सासरी ग जीव आबाळी टांगीला
म्हायेरीच्या वाटं डोळं लागती की झुरणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
म्हायेराचं दिस सुखाचं सरतील
मांडवात डोळं पाण्यानं भरतील
माहेरीच्या घरची मग होशील पाहुणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
Did you enjoy अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) song lyrics?. if there is any mistake in lyrics of अंगणात रंगली ग माहेरची (Anganat Rangali Ga) song please contact us.