उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) Lyrics in Marathi

उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) Lyrics in Marathi

Movie Name : सिंहासन (Simhasan)

उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota)  is the marathi song sung by Asha Bhosle,Ravindra Sathe,Arun Date.

उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) lyrics  has written Suresh Bhat and The music of this song is given by Hridaynath Mangeshkar.

 

उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Ravindra Sathe,Arun Date
Lyricist : Suresh Bhat
Music : Hridaynath Mangeshkar
Genres: Chitrapat Geete,Sfoorti Geete
Movie: सिंहासन (Simhasan)

 उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) Lyrics in Marathi :

 उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
अम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने- ज्यांना प्रेतही न वाली !

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला,
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !

Did you enjoy उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) song lyrics?. if there is any mistake in lyrics of उषःकाल होता होता (Ushakkal Hota Hota) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *