एक होता चिमणा (Ek Hota Chimana) Lyrics in Marathi
Movie Name : सुखाची सावली (Sukhachi Savali)
एक होता चिमणा (Ek Hota Chimana) is the marathi song sung by Aparna Mayekar,Suman Kalyanpur.
एक होता चिमणा (Ek Hota Chimana) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Dutta Davjekar.
एक होता चिमणा (Ek Hota Chimana) Lyrics Credits :
Singer : | Aparna Mayekar,Suman Kalyanpur |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Dutta Davjekar |
Genres: | Chitrapat Geete |
Movie: | सुखाची सावली (Sukhachi Savali) |
एक होता चिमणा (Ek Hota Chimana) Lyrics in Marathi :
एक होता चिमणा, एक होती चिमणी
नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळखदेख
चिमणा म्हणाला चिमणीला, “आपण बांधू घरटं एक”
चिमणी काही बोलेना, जाग्यावरची हालेना
चिमणा म्हणाला, “येशिल ना? माझी मैत्रिण होशील ना?”
चिमणी म्हणाली भीतभीत, “मला किनई पंख नाहीत”
“नसोत पंख नसले तर दोघे मिळून बांधू घर”
चिमणा गेला कामावर, चिमणी बसली झाडावर
चिमणा आला झाडावर, मिळकत घेऊन स्वत:ची
एक कण धान्याचा, एक काडी गवताची
काड्याकाड्या सांधून, घरटं काढलं बांधून
नांदुरकीच्या फांदीवर झुलू लागलं सुंदरसं घर
एके दिवशी अघटित घडले, चिमणीलाही पंख फुटले
चिमणा झाला राजा, चिमणी झाली राणी
एक होता चिमणा, एक होती चिमणी
Did you enjoy एक होता चिमणा (Ek Hota Chimana) song lyrics?. if there is any mistake in lyrics of एक होता चिमणा (Ek Hota Chimana) song please contact us.