ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) Lyrics in Marathi
Movie Name : प्रेमाची गोष्ट (Premachi Gosht)
ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) is the marathi song sung by Bela Shende,Swapnil Bandodkar.
ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) lyrics has written Ashwini Shende and The music of this song is given by Avinash Vishwajeet.
ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) Lyrics Credits :
Singer : | Bela Shende,Swapnil Bandodkar |
---|---|
Lyricist : | Ashwini Shende |
Music : | Avinash Vishwajeet |
Genres: | Chitrapat Geete,Yugul Geete |
Movie: | प्रेमाची गोष्ट (Premachi Gosht) |
ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) Lyrics in Marathi :
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोर्या कागदाची कविता अन् जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे, सलगी करे, का सांग ना?
सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
माझी ही आर्जवे पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा हातात हात दे
पुसुया जुन्या पाऊलखुणा, सोबत तुझी साथ दे
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोर्या कागदाची कविता अन् जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यांतल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला, माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला
ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोर्या कागदाची कविता अन् जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
Did you enjoy ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) song lyrics?. if there is any mistake in lyrics of ओल्या सांजवेळी उन्हे (Olya Sanjveli Unhe) song please contact us.