गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) Lyrics in Marathi

गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) Lyrics in Marathi

Movie Name : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujhya Majhya Sansarala)

गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari)  is the marathi song sung by Prajakta Ranade,Yogita Godbole.

गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) lyrics  has written RRCEON and The music of this song is given by Ajay Atul.

 

गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) Lyrics Credits :

Singer : Prajakta Ranade,Yogita Godbole
Lyricist : RRCEON
Music : Ajay Atul
Genres: Chitrapat Geete,Lok Geete
Movie: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tujhya Majhya Sansarala)

 गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) Lyrics in Marathi :

 गोर्‍यागोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुणु पैंजणं
सजली नटली नवरी आली
गोर्‍या गोर्‍या गालांवरी चढली लाजंची लाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

नवर्‍या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
सासरच्या ओढीनं ही हासते हळूच गाली ग पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

आला नवरदेव वेशीला, वेशीला ग, देव नारायण आला ग
मंडपात गणगोत सारं बैसलं ग म्होरं ढोलताशा वाजि रं

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या मायेसंगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं जड जीव झाला
जड जीव झाला लेक जाय सासरा
किणकिण कांकणं रुणझुणु पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरीदारी.. ग पोरी सुखाच्या सरी..
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली

Did you enjoy गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) song lyrics?. if there is any mistake in lyrics of गोर्‍यागोर्‍या गालांवरी (Gorya Gorya Galavari) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *