Skip to content

चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) Lyrics in Marathi

चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) Lyrics in Marathi

Movie Name : सुधारलेल्या बायका (Sudharlelya Bayaka)

चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya)  is the marathi song sung by Asha Bhosle,Sudhir Phadke.

चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) lyrics  has written Jagdish Khebudkar and The music of this song is given by Bal Palsule.

 

चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) Lyrics Credits :

Singer : Asha Bhosle,Sudhir Phadke
Lyricist : Jagdish Khebudkar
Music : Bal Palsule
Genres: Chitrapat Geete,Yugul Geete
Movie: सुधारलेल्या बायका (Sudharlelya Bayaka)

 चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) Lyrics in Marathi :

 चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची
लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची
दे साथ जीवनाची !

बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची
आले नवी वधू मी ही रात मीलनाची
ही रात मीलनाची !

हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा
उबदार गारव्याचा अंगावरी शहारा
आली जणू कळी ही उमलून यौवनाची
दे साथ जीवनाची !

माझ्या पुढे उभी तू लेऊन रूप साज
का हासते कळेना डोळ्यांमधील लाज
समजूत काढवेना या बावर्‍या मनाची
ही रात मीलनाची !

हाती तुझ्याच हात, हा स्पर्श अमृताचा
घुमतो मनात सूर संसार संगीताचा
गाऊ मिळून नांदी भावी सुखी क्षणांची
दे साथ जीवनाची !

Did you enjoy चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) song lyrics?. if there is any mistake in lyrics of चंद्रातुनी तुझ्या या (Chandratuni Tujhya Ya) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *