तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) Lyrics in Marathi

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) Lyrics in Marathi

Movie Name : माहेरची माणसं (Maherachi Manasa)

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu)  is the marathi song sung by Arun Ingale,Shobha Joshi,Devaki Pandit,Shrikant Pargaonkar,Ravindra Sathe,Ranjana Joglekar.

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) lyrics  has written Sudheer Moghe and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) Lyrics Credits :

Singer : Arun Ingale,Shobha Joshi,Devaki Pandit,Shrikant Pargaonkar,Ravindra Sathe,Ranjana Joglekar
Lyricist : Sudheer Moghe
Music : Sudhir Phadke
Genres: Bhakti Geete,Chitrapat Geete
Movie: माहेरची माणसं (Maherachi Manasa)

 तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) Lyrics in Marathi :

 बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दक्षशापे चंद्र पुरा कोमेजला
शिवकृपायोगे पुन्हा तेजाळला
ज्योतिर्लिंग हे पहिले ब्रह्मदेवे स्थापियले
सोरटीचा सोमनाथ नामें याची ख्याती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्रीशैल गिरीशिखरी शिवतेज वास करी
सती चंद्रावतीसाठी इथे आले उमापती
शैलमल्लिकार्जुन गुण भक्तजन गाती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दैत्यदूषण करी निर्दाळण हुंकाराने त्रिपुरारी
तोच रुद्र सहज होय गवळ्याचा कैवारी
तोच सांब झालासे महाकालेश्वर चित्ताकाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ॐकार होऊन ये चंद्रमौली
विंध्याद्रीची कामना पूर्ण झाली
ॐकार तो जाण हा अमलेश्वर
हीच जाण शिवकुटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

रावणासी फसवुनी गजानने वसविले
ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
देवांचेही धन्वंतरी ज्याच्यामधे प्रवेशले
ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
छायेपरी जिथे आहे संगती पार्वती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

भीमनामें दानवाने बह्मदेवाच्या वराने
केले सार्‍या जगतासी त्राही त्राही त्राही
संहाराया त्या दैत्यासी घेई भीमस्वरुपासी
हर विश्व व्यापुनीया राही राही राही
भीमाशंकराचे ठायी नदी भीमा जन्म घेई
वनी डाकिनी या शंकराच्या अभिषेकासाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

जानकीने रचियले
वालुका लिंग हे श्रीरामाने स्थापियले
भाविकास साधकास नित देत आस
उभा सेतुबंधी रामेश्वर कटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ब्रह्मवाणी ठरू नये खोटी याच्यासाठी इथे शिव भस्मसात झाले हो
त्याच भस्मातून फिरुनिया तेजाळून तिथे ज्योतिर्लिंग प्रकटले हो
औंढा नागनाथ जळावसे सदा येथ
नाग जनासाठी तेच तया त्रिकाळी पूजिती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

कैलास सोडुन ये सांब भोळा
भुलला कसा या वाराणशीला?
विश्वेश्वर शिवक्षेत्र सदैव स्मर
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गोदावरी कटी एका ठायी नांदताती तिघे
ब्रह्मा विष्णु महेश
वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस
भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गंगाधरा, केदारनाथ कर्पूरगौर
शीवलील कंठ सूख शांती देत
भवदु:ख दूर करी विश्वनाथ
केदारनाथ केदारनाथ
परतत्‍व येथ पावेल शांती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्री घॄष्णेश्वर वेरूळ गावी
काय तयाची महती गावी
विरह न साहे कैलासाला
लेणे होऊन समीप आला
ग्रहणकाली शीवपावन वेडी
शीवभक्तांची दाटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

Did you enjoy तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तिथे नांदे शंभू कैलासाचा पती (Tithe Nande Shambhu) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *