Skip to content

तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) Lyrics in Marathi

तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) Lyrics in Marathi

Movie Name : उमज पडेल तर (Umaj Padel Tar)

तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha)  is the marathi song sung by .

तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) Lyrics Credits :

Singer :
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Chitrapat Geete,Lavani,Mana Tujhe Manogat
Movie: उमज पडेल तर (Umaj Padel Tar)

 तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) Lyrics in Marathi :

 ऐन वयात आलेली मी रे नाजूक छबी, आले बाजारा एकली
सांगलीच्या पेठंत बाजाराच्या वाटंत काय होतं घाटंत तुझ्या मनी?
तुझ्या मनी तेच माझ्या मनी

मोठी कलदार नाण्यांची ओतली
नथ मोत्यांची विकत घेतली
गोर्‍या नाकात झोकात घातली
आपुल्याच तोर्‍यात चालता मी बार्‍यात काय आलं होर्‍यात तुझ्या मनी?
तुझ्या मनी तेच माझ्या मनी

सार्‍या चिंचांचा सौदा करून
हारा माथी मी घेतला भरून
घरी निघाले लगबग करून
संग संग चालायचं काही नाही बोलायचं हेतू होता हमखास तुझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी

आली बोरंची पाणंद थोडी
दोन्ही बाजूनी दाटली झाडी
तुझ्या डोळ्यात चमचम बेडी
चालताना मागून हात तुझा लागून वीज गेली जागून माझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी

काही ओळख पाळख नसून
मी रे उगाच हसून
थोडं लटकं लटकं रुसुन
पुढं पुढं चालायचं काही नाही बोलायचं हेतू होता हमखास माझ्या मनी
तुझ्या मनी तेच माझ्या मनी

Did you enjoy तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of तुझ्या मनी तेच माझ्या मनी (Tujhya Mani Tech Majha) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *