दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) Lyrics in Marathi
Movie Name : शापित (Shapit)
दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) is the marathi song sung by Asha Bhosle,Suresh Wadkar.
दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) lyrics has written Sudheer Moghe and The music of this song is given by Sudhir Phadke.
दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle,Suresh Wadkar |
---|---|
Lyricist : | Sudheer Moghe |
Music : | Sudhir Phadke |
Genres: | Chitrapat Geete,Yugul Geete |
Movie: | शापित (Shapit) |
दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) Lyrics in Marathi :
तुज्यामाज्या संसाराला आनि काय हवं
तुज्यामाज्या लेकराला घरकूल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल
अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पाणी?
राहील का सुकंल ते तुज्यामाज्यावानी?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ
ढगावानी बरसंल त्यो, वार्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुज्यामाज्या जिवाचा त्यो आरसा असंल
उडुनिया जाईल ही आसवांची रात
आपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
Did you enjoy दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) song lyrics?. if there is any mistake in lyrics of दिसं जातील दिसं येतील (Disa Jateel Disa Yeteel) song please contact us.