फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) Lyrics in Marathi

फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) Lyrics in Marathi

Movie Name : मल्हारी मार्तंड (Malhari Martand)

फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala)  is the marathi song sung by Sulochana Chavan.

फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Vasant Pawar.

 

फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) Lyrics Credits :

Singer : Sulochana Chavan
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Vasant Pawar
Genres: Chitrapat Geete,Lavani
Movie: मल्हारी मार्तंड (Malhari Martand)

 फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) Lyrics in Marathi :

 फड सांभाळ तुर्‍याला ग आला
तुझ्या उसाला लागंल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला

लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्‍या राती राहिल कोण जागं?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन्‌ गेला

Did you enjoy फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) song lyrics?. if there is any mistake in lyrics of फड सांभाळ तुर्‍याला ग (Phad Sambhal Turyala) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *