महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) Lyrics in Marathi
Movie Name : चिमण्यांची शाळा (Chimanyanchi Shala)
महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) is the marathi song sung by Asha Bhosle,Sudhir Phadke.
महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) lyrics has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.
महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) Lyrics Credits :
Singer : | Asha Bhosle,Sudhir Phadke |
---|---|
Lyricist : | Ga Di Madgulkar |
Music : | Sudhir Phadke |
Genres: | Chitrapat Geete,Sawal Jabab |
Movie: | चिमण्यांची शाळा (Chimanyanchi Shala) |
महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) Lyrics in Marathi :
महेशमूर्ती तुम्ही सभाजन करा निवाडा हवा तसा
तुरेवाल्याच्या उरी उठविते मी कलगीचा पाय ठसा
मर्यादेने बोल जराशी धर श्रोत्यांची भीड जरा
बडबडीने का पडेल खाली विद्वत्तेचे चिन्ह तुरा
विद्वत्तेची उडवीन पगडी मी जातीने नार तरी
सवालास दे जबाब माझ्या मग विद्वत्ता तुझी खरी
गाडाभरुनी ग्रंथ वाचले तुरा लाविला म्हणुनी शिरी
तू मातीची जिती बाहुली कर मुजरा अन् परत घरी
एकच पुसते सवाल त्याचे उत्तर दे मग बोल चढे
आभाळाहून काय थोरले काय धाकटे तिळापुढे
मन मनुजाचे विशाल होते आभाळाहुन कधी कधी
कधी आकसून होते हलके लपून बसते तिळामधी
प्रश्नावरुनी कळते अक्कल आम्ही मापतो उंची ग
विद्वत्तेची शाल अम्हांवर तुला मुलाची कुंची ग
सवाल कसला व्यर्थ पुसावा एक उखाणा पुरे तुला
सोडविण्याला अतिशय सोपा सुचेल उत्तर सहज तुला
घड्याएवढा जाड भोपळा वेल तयाचा बोटभरी
पाच पुरुष वर वाढे कवठी फळे तिची का मुठभरी
दोन दिसांचा देतो अवधी उत्तर शोधून आण इथे
नाही गावले तर मग ठरले मस्तक बाई तुझे रिते
मायेने ही केली रचना तुझ्याचसाठी सर्व नरा
वृक्षवल्लरी तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी सर्व धरा
विसाव्यास जरी जाईल माणूस दमुनी-शीणुनी तरूतळी
उंच तरूला फळे चिमुकली म्हणुनी लागती धरातळी
कवठी जर असती पिकली घड्याएवढी अशी फळे
अपघाताने मेली असती रोज अचानक मनुज फळे
Did you enjoy महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) song lyrics?. if there is any mistake in lyrics of महेशमूर्ती तुम्ही सभाजन (Mahesh Murti Tumhi) song please contact us.