शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) Lyrics in Marathi
Movie Name : नांदायला जाते (Nandayala Jate)
शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) is the marathi song sung by Suman Kalyanpur.
शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) lyrics has written P Savlaram and The music of this song is given by Vasant Prabhu.
शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) Lyrics Credits :
Singer : | Suman Kalyanpur |
---|---|
Lyricist : | P Savlaram |
Music : | Vasant Prabhu |
Genres: | Bal Geete,Chitrapat Geete |
Movie: | नांदायला जाते (Nandayala Jate) |
शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) Lyrics in Marathi :
एक दोन तीन चार
शिका शिका रे शिका शिका
वाचा आणिक लिहा चला
काढा गिरवा आकडा एक
जगात आहे देवही एक
देते जन्म जी आपणाला प्रेमळ आई असते एक
नयनी तिचिया देव बघा रे देव बघा
वाचा आणिक लिहा चला
एक एक मिळता होती दोन
आता पाहू या काढतो कोण
हात-पाय-डोळे-कान किती किती बघा मोजुनी दोन
एकच आपुल्या या देहा रे या देहा
वाचा आणिक लिहा चला
दोना नंतर तीन, वाचा एक-दोन-तीन
दत्त दिगंबर तीन मुखाचा
तीनच पाने त्या पळसाला कोकण झाला जरी देशाचा
मुळात माणूस एक असा रे एक असा
वाचा आणिक लिहा चला
आता राहिला आकडा चार
घरास अपुल्या भिंती चार
पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर
निळ्या नभाचे छप्पर सुंदर याच दिशांच्या चौकानावर
घर करता हा देवबाप्पा रे देवबाप्पा
Did you enjoy शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) song lyrics?. if there is any mistake in lyrics of शिका शिका रे शिका शिका (Shika Shika Re Shika) song please contact us.