Skip to content

अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) Lyrics in Marathi

अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) Lyrics in Marathi

Movie Name : तुमचं आमचं जमलं (Tumacha Aamacha Jamala)

अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula)  is the marathi song sung by Mahendra Kapoor.

अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) lyrics  has written Dada Kondake and The music of this song is given by Ram Laxman.

 

अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) Lyrics Credits :

Singer : Mahendra Kapoor
Lyricist : Dada Kondake
Music : Ram Laxman
Genres: Bhakti Geete,Chitrapat Geete
Movie: तुमचं आमचं जमलं (Tumacha Aamacha Jamala)

 अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) Lyrics in Marathi :

 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेउनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्‍नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

Did you enjoy अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) song lyrics?. if there is any mistake in lyrics of अंजनीच्या सुता तुला रामाचं (Anjanichya Suta Tula) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *