Skip to content

इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) Lyrics in Marathi

इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) Lyrics in Marathi

Movie Name : प्रपंच (Prapancha)

इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha)  is the marathi song sung by Sudhir Phadke.

इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) lyrics  has written Ga Di Madgulkar and The music of this song is given by Sudhir Phadke.

 

इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) Lyrics Credits :

Singer : Sudhir Phadke
Lyricist : Ga Di Madgulkar
Music : Sudhir Phadke
Genres: Bal Geete,Chitrapat Geete
Movie: प्रपंच (Prapancha)

 इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) Lyrics in Marathi :

 इवल्याइवल्या वाळूचं
हे तर घरकुल बाळूचं
बाळू होता बोटभर
झोप घेई पोटभर
वरती बाळू
खाली वाळू
बाळू म्हणे की, “इथेच लोळू”
उन्हात तापू लागे वाळू
बाळूला ती लागे पोळू
या इवल्याशा खोपेत
बाळू रडला झोपेत !

एक वन होतं वेळूचं
त्यात घर होतं साळूचं
साळू मोठी मायाळू
वेळू लागे आंदोळू
त्या पंख्याच्या वार्‍यात
बाळू निजला तोर्‍यात !
एकदा पाऊस लागे वोळू
भिजली वाळू, भिजले वेळू
नदीला येऊ लागे पूर
बाळू आपला डाराडूर

भुर्रकन्‌ खाली आली साळू
आणि म्हणाली, “उठ रे बाळू”
बाळू निजला जैसा धोंडा
तोवर आला मोठा लोंढा
साळुनं मग केलं काय?
चोचीत धरला त्याचा पाय
वेळूवरती नेले उंच
आणि मांडला नवा प्रपंच
बाळूचं घरकुल वाहून गेलं
साळूचं घरटं राहून गेलं !

साळू आहे मायाळू
बाळू बेटा झोपाळू
वाळू आणि वेळूवर
ताणून देतो खालीवर
साळू म्हणते, “गाऊ, खेळू”
बाळू म्हणतो, “इथंच लोळू.”
आमची गोष्ट आखुड
संभ्याच्या पाठीत लाकूड

Did you enjoy इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) song lyrics?. if there is any mistake in lyrics of इवल्याइवल्या वाळूचं (Ivalya Ivalya Valucha) song please contact us.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *