Ashtavinayaka Tuza Mahima Kasa Lyrics from Movie Ashtavinayak.The song is sung by Anuradha Paudwal and Pandit Vasantrao Deshpande.and The music of this song is given by Anil-Arun. The music video of Ashtavinayaka Tuza Mahima Kasa 's song is directed by Anil-Arun.
Ashtavinayaka Tuza Mahima Kasa Lyrics In Marathi - Ashtavinayak :
अष्टविनायका तुझा महिमा कसा दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा
गणपती पहिला गणपती मोरगावचा मोरेश्वर लई मोठं मंदिर अकरा पायरी हो अकरा पायरी हो नंदी कासव सभामंडपी नक्षी सुंदर शोभा साजरी हो शोभा साजरी हो मोरया गोसाव्यानं त्याचा घेतला वसा
गणपती दुसरा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी काय सांगू आता काय सांगू डाव्या सोंडेचं नवाल केलं साऱ्यांनी ईस्तार ह्येचा केला थोरल्या पेशव्यांनी रमाबाईला अमर केलं वृंदावनी जो चिंता हरतो मनातली तो चिंतामणी भगताच्या मनी त्याचा अजुनी ठसा
गणपती तिसरा गणपती सिद्धिविनायका तुझा सिद्धटेक गाव रं पायावरी डोई तुझ्या भगताला पाव रं दैत्य मधु-कैटभानं गांजलं हे नगर ईष्णूनारायण गाई गणपतीचा मंतर राकूस मेलं नवाल झालं टेकावरी देऊळ आलं लांबरुंद गाभाऱ्याला पितळेचं मखर चंद्र सूर्य गरुडाची भवती कलाकुसर मंडपात आरतीला खुशाल बसा
गणपती गणपती गं चौथा गणपती बाई रांजणगावचा देव महागणपती दहा सोंडा ईस हात जणू मूर्तीला म्हनती गजा घालितो आसन डोळं भरून दर्शन सूर्य फेकी मूर्तीवर येळ साधून किरण किती गुणगान गावं किती करावी गणती बाई रांजणगावचा देव महागणपती पुण्याईचं दान घ्यावं ओंजळ पसा
गणपती पाचवा पाचवा गणपती ओझरचा इघ्नेश्वर बाई लांब रुंद आहे मूर्ती जडजवाहीर त्याचं काय सांगू शिरीमंती डोळ्यामंदी माणकं हो हिरा शोभतो कपाळा तहानभूक हरती हो सारा बघून सोहळा चारीबाजू तटबंदी मधी गणाचं मंदिर ओझरचा इघ्नेश्वर इघ्नहारी इघ्नहर्ता स्वयंभू जसा
गणपती सहावा गणपती लेण्याद्री डोंगरावरी नदीच्या तीरी गणाची स्वारी तयाला गिरिजात्मज हे नाव दगडमंदी कोरलाय भक्तिभाव रमती इथं रंकासंगती राव हे जी खडकांत केलं खोदकाम दगडांत मंडपी खांब वाघ सिंह हत्ती लई मोठं, दगडांत भव्य मुखवट गणेश माझा पुत्र असावा ध्यास पार्वतीचा अन् गिरिजात्मज हा तिनं बनवला पुतळा मातीचा दगड माती रूप देवाचं लेण्याद्री जसा
सातवा गणपती राया महड गावाची महसूर वरद विनायकाचं तिथं एक मंदिर मंदिर लई सादसूद जसं कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी, नक्षी नागाची कळसाच्या वरं सपनात भक्ताला कळं, देवळाच्या मागं आहे तळं मूर्ती गणाची पाण्यात मिळं त्यानं बांधलं तिथं देऊळ दगडी महिरप सिंहासनी या प्रसन्न मंगलमूर्ती वरदानाला विनायकाची पूजा कराया येती हो चतुर्थीला गर्दी होई रात्रंदिवसा
आठवा आठवा गणपती आठवा पाली गावच्या बल्लाळेश्वरा आदिदेव तू बुद्धिसागरा स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख सूर्यनारायण करी कौतुक डाव्या सोंडेचे रूप साजिरे कप्पाळ विशाळ डोळ्यांत हिरे चिरेबंद या भक्कम भिंती देवाच्या भक्तीला कशाची भीती ब्रम्हानंदी जीव होई वेडा की पिसा
All lyrics are property and copyright of their owners. All lyrics provided for educational purposes and personal use only. Copyright @ 2019-2024 hindimarathilyrics.in