Mauli Mauli Lyrics from Movie Lai Bhaari.The song is sung by Ajay Gogavale. Guru Thakur has written Mauli Mauli song lyricist_str and The music of this song is given by Ajay Atul. The music video of Mauli Mauli 's song is directed by Ajay Atul.
pundalik warade haari withhthhal shri jnjaanadew tukaaraam pndharinaath mahaaraaj ki jay
Mauli Mauli Lyrics In Marathi - Lai Bhaari :
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा
दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा
भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा
माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, माऊली माऊली
पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
Mauli Mauli Youtube Video Song :
Did you enjoy Mauli Mauli song lyrics?. if there is any mistake in lyrics of Mauli Mauli song please contact us.
All lyrics are property and copyright of their owners. All lyrics provided for educational purposes and personal use only. Copyright @ 2019-2024 hindimarathilyrics.in